Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहवाल बंद आंदोलन...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहवाल बंद आंदोलन…

विविध प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने निर्णय; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी,ता.०१: जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी तसेच एन एच एम कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने आज पासून जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील कर्मचारी सक्रिय सहभागी झाले आहेत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले.

जिल्हा परिषद स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य संघटनेकडून वारंवार शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहेत.

मात्र शासनाकडून या मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने एक ऑक्टोबरपासून अहवाल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आजपासून या अहवाल बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद सावंत सरचिटणीस प्रकाश तेंडोलकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments