आणखी एकाचा मृत्यू; तालुक्यातील ८ बळी…
वेंगुर्ला,ता.०१: तालुक्यात आज ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून तालुक्यातील बळींची संख्या ८ झाली आहे,अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यात आज एकूण ६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये केरवाडा १, शिरोडा १ सहवासीत, पालकरवाडी २ सहवासीत वेंगुर्ला शहर २ सहवासीत यांचा समावेश आहे.
दरम्यान आज ८ व्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील रेडी कनयाळ येथील ७६ वर्षीय व्यक्ती २४ सप्टेंबर पासून ओरोस येथे उपचार घेत होती. त्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आलेले होते. परंतु आज सकाळी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे.