बांदा,ता.०१: भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सभापती मानसी धुरी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, तालुकाध्यक्ष महेश धुरी, उपसभापती शीतल राऊळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, महिला तालुकाध्यक्ष धनश्री गावकर, राज्य परिषद सदस्य मंदार कल्याणकर, बांदा विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ग्रा. पं. सदस्य मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, मकरंद तोरसकर, अंकिता देसाई, शहर अध्यक्ष राजा सावंत, शेर्ले सरपंच उदय धुरी, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, उमेश पेडणेकर, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, सिद्धेश महाजन, श्याम सावंत आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व घोषणा देण्यात आल्या.
फोटो:-
भाजप राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांचे बांदा येथे स्वागत करण्यात आले. (छायाचित्र- निलेश मोरजकर)
भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांचे बांद्यात स्वागत…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES