Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी तालुक्यात भात कापणीला सुरूवात...

वैभववाडी तालुक्यात भात कापणीला सुरूवात…

वैभववाडी/पंकज मोरे,ता.०२: तालुक्यात परतीच्या पावसाने विश्रांती दिल्यानंतर भात कापणी व भात झोडणीला सुरूवात झाली आहे. सध्या शेतकरी भात कापणी करण्यात मग्न असताना पाहायला मिळत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात पिकही चांगले आहे. आठवडा भरापासून पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी भात कापणी करण्यात मग्न आहे. संध्याकाळनंतर आकाशात ढग दाटून येत असल्याने शेतकरी सकाळच्या सत्रात भात कापणी करतो तर संध्याकाळी भात झोडणीला सुरूवात करत आहेत.
तर काही शेतकरी यंत्राव्दारे भात कापणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची यंत्राव्दारे भात कापणीला पसंती आहे. यांत्रिकीकरणामुळे भात उत्पादक शेतकरी तंत्रज्ञानाची कास धरून नप्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments