सावंतवाडीत आंदोलन ; काँग्रेस अंतर्गत वाद बाजूला ठेवून दोन्ही गट एकत्र…
सावंतवाडी,ता.०२: काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना झालेली धक्काबूकी आणि उत्तर प्रदेश येथे मुलीवर झालेल्या अन्याय यांच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून येथील गांधी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.विशेष म्हणजे यावेळी गेले काही दिवस अंतर्गत कलह सुरू असलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.त्यामुळे आजच्या आंंदोलनासोबत त्यांचे एकत्र येणे चर्चेचा विषय ठरला होता.
जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यश कौस्तूभ गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, इर्शाद खान, रविंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. येथील गांधी चौक परिसरात उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवून हे आंदोलन केले.यावेळी श्री.गावडे म्हणाले, राष्ट्रीय पक्षाचे नेते असलेल्या श्री.गांधी यांच्यासोबत पोलिसांकडुन झालेली वागणूक ही अत्यंत चुकीची आहे.याचा आम्ही जिल्हा काँग्रेस म्हणून तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.