पोलीस ठाण्यात धाव; ३८ हजाराचा मुद्देमाल लंपास…
बांदा ता ०२: शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोडून अज्ञात चोरट्यानी ३८ हजार रुपये किमतीचा संगणक व प्रिंटर चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली. भरवस्तीत असलेल्या शाळेत चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापिका श्रीमती भगत व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी चोरीची फिर्याद देण्यासाठी बांदा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत. ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक कामासाठी संगणकावर काम करण्यात आले होते. त्यानंतर आज शिक्षकांनी संगणकावर काम करण्यासाठी शाळेत आले असता संगणक कक्षाला दुसरेच कुलूप लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे कुपुल तोडण्यात आल्यानंतर आतील संगणक व प्रिंटर चोरीस गेल्यास आढळले. मुख्याध्यापिका भगत यांनी याची कल्पना शाळा व्यवस्थापन समितीला दिली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.