कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप; चौकशीसह कारवाईची मागणी…
दोडामार्ग ता.०२: मागेेंली सरपंच अविश्वासाच्यावेळी
कंटेन्मेट झोनमधील सदस्याला उपस्थित राहण्याची परवागनी देणार्या “त्या” अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांनी आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान जो पर्यत संबधित प्रकरणाची चौकशीचे आश्वासन मिळत नाही,तसेच त्या अधिकार्यावर कारवाई केली जात नाही,तो पर्यत आपण माघार घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.आज पासून त्यांनी आपल्या बेमुदत आंदोलनाला सुरवात केली आहे.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत आठलेकर, संजय मणेरकर,योगेश महाले,समिर रेडकर, आदींनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला आहे.