वेंगुर्ला,ता.०२: वेंगुर्ला-कॅम्प येथील निशाण तलाव जलशुद्धीकरण प्रकल्प हा काही वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र, सद्यस्थिती पाहता येथील प्रकल्पाची दुरावस्था दिसुन आलेली आहे. यामध्ये गंज चढलेले यांत्रिकी उपकरणे, सडलेले पाईप अशामुळे येथील शुद्धीकरण करण्यात येणारे पाणी हे दुषित होऊन ते पाणी वेंगुर्ला शहरात सर्वत्र पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील लोकांना याचा त्रास होऊ लागला आहे. यासंबंधी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालावे व पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वेंगुर्ला शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेना कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्यासह शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, शाखाप्रमुख आनंद बटा, संदीप केळजी, गौतम मुळे, गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, दया खर्डे, सुनील वालावलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पहाणी करून नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे.
वेंगुर्लेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरावस्था…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES