वेंगुर्ला,ता.०२:
तालुक्यातील परबवाडा-गवंडेवाडी येथील विनोद उर्फ आप्पा विजय गवंडे वय ३७ हा रात्री आपल्या राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
लॉकडाऊन मध्ये गवंडेवाडी येथील विनोद आपल्या कुटुंबासमवेत चतुर्थीला मुंबई येथून गावी आला होता. आई, वडील, पत्नी, लहान दोन मुलगे यांच्या समवेत तो गवंडेवाडी येथे घरी राहत होता. मात्र काल रात्री तो गळफास घेऊन लटकत असल्याचे पत्नी अंकिता हिने पाहताच तीने ओरड मारली. तात्काळ त्याला रुग्णालयात नेले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. या बाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.हे.कॉ. आर.व्ही.दळवी करीत आहेत.