काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध…
कुडाळ, ता. ०२ : योगी सरकारच्या राज्यात भ्रष्ट कारभार चालू असून खुले आम बलात्कार होत असून या घटना दडपल्या जात आहेत. त्याठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना झालेली धक्काबुक्की पाहता हे योगी सरकार अत्यंत घृणास्पद वागणूक जनतेला देत असून याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस व सेवादल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबई – गोवा महामार्गावरील कुडाळ पिंगुळी वड गणेश मंदिर येथे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी देवानंद लुडबे, श्रीकृष्ण तळवडेकर, महेश अंधारी, अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, गणेश पाडगावकर, चंदन पांगे, सरदार ताजर, प्रभाकर हेदुळकर, देवा चिंदरकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी योगी सरकार भ्रष्ट सरकार, हमे न्याय चाहीये, योगी तो भोगी है, योगी सरकार पापी है, असे नारे देण्यात आले. त्यावेळी महामार्गावर वाहने थांबली होती. तब्बल १५ मिनीट हे आंदोलन चालले असताना एकाही वाहन चालकाने घाई न करता वाहने थांबवली व खऱ्या अर्थाने ही दंडुकेशाही थांबली पाहिजे असे मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केले.