सरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांचाही सहभाग…
वेंगुर्ला,ता.०२:महात्मा गांधी यांचे स्वच्छ गाव सुंदर गाव या प्रेरणादायी विचारातून त्यांच्या आज जयंती दिवशी शिरोडा गाव स्वच्छ सुंदर राहावा यासाठी वेळागर समुद्र किनारा भागात स्वच्छता मोहीम घेण्यात आली व बहुतांशी समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच ग्रामस्थ सहभागी होऊन महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त घेतलेली स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात आली.
आज २ ऑक्टोबर रोजी राष्ट्पिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती. ग्राम पंचायत शिरोडा कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कोरोना अंतर्गत शासन नियमांचे पालन करण्यात आले. त्याच प्रमाणे सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती याना स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केल्या प्रमाणे शिरोडा येथील शाळा नं . १ , केरवाडी शाळा , वेळागर शाळा येथे ही शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून व काही शाळांचे पुढील नियोजन करून सर्व शाळा माध्यमातून आदर्शवत कामगिरी केली आहे .अशा प्रकारे स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हिरहीरीने सहभाग घेतला. त्याबद्दल शिरोडा सरपंच श्री. मनोज उगवेकर यांनी आभार व्यक्त केले.