Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांची वेंगुर्ला सभापती, उपनगराध्यक्षांनी घेतली भेट...

राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांची वेंगुर्ला सभापती, उपनगराध्यक्षांनी घेतली भेट…

तालुक्यातील आरोग्य विषयक विविध समस्यां संदर्भात केली चर्चा…

वेंगुर्ला,ता.०२:जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांची वेंगुर्ला सभापती अनुश्री कांबळी आणि उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी तालुक्यातील आरोग्य विषयक विविध समस्यां संदर्भात चर्चा केली.
राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर आज सिंधुदुर्ग दौ~यावर असुन त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच कोविड १९ संदर्भात शासकीय विश्रामगृहात येथे आढावा बैठक घेतली, या बैठकीत कोविड रुग्णावर केले जाणारे औषधोपचार,कोविड केअर सेंटर,कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत केल्या जाणार्‍या उपाययोजना,औषधसाठा तसेच जिल्ह्यातील आरोग्य सोयीसुविधांचा आढावा घेतला.
दरम्यान वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सौ.अनुश्री कांबळी आणि वेंगुर्ले नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.अस्मिता राऊळ यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांची भेट घेत वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयासाठी व्हँन्टिलेटर,अल्टरासाउंड मशिन, आँक्सीजन,एक्सरे मशिन अशा मशनरींची आवश्यकता असुन वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला आणि शिरोडा येथिल उपजिल्हा रुग्णालयाला स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी तसेच तालुक्यातील परुळे आणि आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणारी सर्व रिक्त पदे त्यात डाँक्टर,नर्स, यांचे सह तांत्रिकपदे, कार्यालयिन पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी केली आहे.
यावेळी मंत्री महोदयांनी रिक्त पदासंदर्भात येत्या मंगळवारी मुंबई मध्ये आमदार वैभव नाईक आणि आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.रुग्णवाहिका संदर्भातील आपली मागणी आणि सुसज्ज मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबतची आपली मागणी पुर्ण करण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. या बैठकीप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, डॉ.वालावलकर,डॉ झाट्ये, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अवधूत मालवणकर,संदेश पटेल,सचिन वालावलकर,सुनील डुबळे,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments