बांदा,ता.०३: भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे बांदा येथे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद सावंत, युवानेते आनंद शिरवलकर, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, जिल्हा सरचिटणीस संदिप मेस्री, जिल्हा प्रवक्ता दादा साईल, उपसभापती शीतल राऊळ, तालुका कार्यकारणी सदस्य सुनील धामापूरकर, शहर उपाध्यक्ष शानू पेडणेकर, सिद्धेश महाजन, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, विभाग प्रमुख गुरु सावंत, तालुका सरचिटणीस सुनील राऊळ, जिल्हा सचिव संजय नाईक, दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, दिपक गवस, जिल्हा युवा सोशल मिडिया अध्यक्ष राजवीर पाटील, मंदार पडवळ, शहर अध्यक्ष राजा सावंत, साईनाथ धारगळकर, युवा शहर अध्यक्ष साई सावंत, तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, तालुका सरचिटणीस मधुकर देसाई, जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आगचेकर, संदिप बांदेकर, ता. उपाध्यक्ष सिध्देश कांबळी, नारायण कांबळी, ता. सोशल मिडीया प्रमुख काशीनाथ केरकर, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, प्रविण पंडीत, संतोष पुजारे, स्वप्नील सावंत, समीर सावंत, दिनेश कविटकर, विकी कदम, अक्षय परब, शुभम साळगावकर, प्रजेस सावंत आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या स्वागतासाठी बांद्दात जमलेली कार्यकर्त्यांच्या गर्दीने आपण भारावून गेलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पुन्हा येऊन येथील कार्यकर्त्यांसाठी निश्चितच वेळ देऊ असे आश्वासन पाटील यांनी बोलताना दिले.