Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची आर्थिक लुटमार...

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची आर्थिक लुटमार…

परशुराम उपरकर  ;कार्डिएक रुग्णवाहीका नसल्याने राजरोस प्रकार…

कणकवली, ता.०३ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाकडे एकही कार्डिएक रुग्णवाहीका, शववाहीका नसल्यामुळे गंभीर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खासगी कार्डिएक रुग्णवाहीकाधारकांकडून आर्थिक लुटमार होत असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला.
श्री उपरकर म्हणाले, जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या कोरोनामुळे किंवा कोरोनाकाळात अत्यवस्थ होणार्‍या गंभीर रुग्णांना कोल्हापुर, मुंबई इतर ठिकाणी हलविण्याचे झाल्यास कार्डिएक असलेली रुग्णवाहीका जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु ती उपलब्ध नसल्याने सध्या कोरोनाकाळात खाजगी रुग्णवाहीकाधारक व रुग्णालयांकडुन ओरोस येथुन मुंबई येथे रुग्णास नेण्यासाठी ५० ते ६० हजारांची व कोल्हापुर येथे नेण्यासाठी ३० ते ३५ हजारांची मागणी करतात. शिवाय संबंधित रुग्णालयांकडुन सोबत डॉक्टर तांत्रिक कर्मचारी दिला जात नसल्याने वाटेतच रुग्णाचा मृत्यु होण्याचा धोका पत्करुन रुग्णांना दुसरीकडे हलवित आहेत. अशा प्रकारच्या आर्थिक लुटमारीमुळे श्रीमंतांबरोबरच अत्यंत गरीब कुटुंबे भरडली जात आहेत. व अनेक रुग्णांचे कार्डिएक रुग्णवाहीका अभावी प्राण गेलेले आहेत. याचे सोयरसुतक सत्ताधार्‍यांना राहीलेले नाही.
जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनामुळे अतिगंभीर झालेल्या रुग्णांना कोल्हापुर किंवा मुंबईकडे नातेवाईक नेऊ पाहतात. मात्र जिल्हा रुग्णालयाकडे कार्डिएक रुग्णवाहीका नसल्याने त्याची व्यवस्था तात्काळ केली पाहीजे अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.
हल्लीच पालकमंत्र्यांनी, खासदारांनी व आमदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासाठी ६ रुग्णवाहीका व ४ शववाहीनी वाहने उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यामध्ये कार्डिएक रुग्णवाहीकेचा समावेश नव्हता. त्यामुळे रुग्णांची गरज लक्षात घेऊन कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तात्काळ कार्डिएक व शववाहीनी रुग्णवाहीका उपलब्ध करुन त्यासोबत डॉक्टर व वाहनचालक यांचीही व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन अतिगंभीर रुग्णांचे प्राण वाचु शकतील.
त्याचप्रमाणे शववाहीनीका नसल्याने खाजगी रुग्णवाहीका शववाहीनी मृत शववाहीनी करण्याकरीता मृतदेह नेण्याकरीता ओरोसवरुन आंबोली येथे नेताना २२,०००/- रुपयांची मागणी केली जाते. कुटुंबातील व्यक्तीचे मृत झाल्यानंतर दुःखात असताना कोरोना किंवा अन्य मृत रुग्णांच्या भावना गुंतवल्या असल्याने गावातील स्मशानभुमीतही नेण्याची भावना गुंतली असल्याने त्यातुन आर्थिक लुटमार करणार्या रुग्णधारक वाहीकांकडुन कार्डिएक रुग्णवाहीकेचा धारकांकडुन होणार्‍या लुटीबाबत जिल्हाधिकारी व आरटीओ यांनी नियंत्रण आणुन रुग्णांच्या नातेवाईकांना मुबलकदरात कार्डिएक रुग्णवाहीका मृत झालेल्या रुग्णांना रुग्णवाहीका देण्यात यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments