चालकासह चौघे जखमी : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले…
कणकवली, ता.०३ : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला भीषण अपघात झाला. हा चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर पलटी होऊन पडली झाली. यात कार मधील चालकासह चार जण जखमी झाले आहेत. त्या जखमींना उपचारासाठी ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान अपघात झाल्यानंतर जखमींना घेण्यासाठी थांबलेल्या पिंट्या जाधव रुग्णवाहिका, मोटरसायकल आणि टाटा हत्ती टेम्पोला दिलीप बिल्डकॉनच्या काँक्रीट मिक्सर वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिली. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे,अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळी कणकवली पोलिस दाखल झाले आहेत.