बांदा,ता.०३:भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा संयोजकपदी माजी जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांची निवड झाली आहे.जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तसे नियुक्तीपत्र कामत यांना दिले आहे.प्रमोद कामत हे भाजपचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. आगामी तीन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सहकार विभागातील निवडणूका होणार आहेत. देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आगामी सर्व निवडणूका जिंकण्याचे पक्षासमोर ध्येय आहे. त्यासाठी सर्व बुथ सक्षम करणे आवश्यक आहे.महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिक पक्षाचे सदस्य झाले आहेत.समाजाच्या सर्व घटकांशी भाजप पक्ष जोडला गेला आहे.विधानसभा मतदार संघात पक्ष मजबुत करण्यासाठी कामत यांच्यावर संयोजक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमोद कामत यांनी यापूर्वीही आपल्या संघटन कौशल्यावर अनेक निवडणूकांमध्ये एकहाती विजय संपादन केला आहे. विधानसभा निवडणूकीत बांदा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान भाजपाला मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची संयोजकपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.