दोडामार्ग येथील घटना; चिरेखाण मालकावर गुन्हा दाखल करा,शिवसेनेची मागणी…
दोडामार्ग,ता.०४: वझरे येथे असलेल्या उघड्या चिरेखाणीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी घडली.दरम्यान महसूल विभागाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे.धोंडीराम भगवान जंगले वय (8) नागेश विठ्ठल जंगले वय (१०)अशी त्या मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले आपल्या आई समवेत परिसरात गेली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,आई कपडे धूत असताना तिची नजर चुकवत दोघे या परिसरात गेली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले.हा प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ झाला होता.दरम्यान या प्रकरणी खाणमालकर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
दोघा चिमुकल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.