सावंतवाडी. ता. ०४: येथील संस्थानाच्या ऐतिहासिक लाकडी खेळण्यांना आता पोस्टकार्डावर स्थान मिळाले आहे. त्यामुळे पर्यटन दृष्ट्या सावंतवाडी,कोकण आणि पर्यायाने सावंतवाडी संस्थानचे महत्व वाढणार आहे.
त्यामुळे सावंतवाडी संस्थानचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जगप्रसिद्ध होणार आहे तसेच पर्यटनदृष्ट्या कोकणचे महत्त्व अधोरेखित होईल,अशी अपेक्षा आहे.पोस्टकार्ड ही केवळ संदेशवाहनाचे साधन असलेली नाही. स्मरणिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ग्राहकासाठी तर ही पोस्टकार्ड खूप किंमती असतात, भारताच्या मातीत घडलेली खेळणी, विविध गावांमधील कलाकारांनी घडवले खेळणी १५१ वर्षांच्या भारतातील पोस्टाच्या प्रवासाच्या निमिताने भारतीय पोस्टकार्डावर विराजमान झाली आहे.कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेला लाकडी खेळणी आता पोस्टकार्डच्या माध्यमातून देशभरात पोहोचतील, त्यामुळे सावंतवाडीची लाकडी खेळणी पुन्हा एकदा जगप्रसिद्ध होणार आहेत.सावंतवाडी संस्थान मधील जागतिक पातळीवर गंजिफा हा खेळ पोहोचला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा गंजिफा, खेळणी लोकप्रिय होतील.