डोंगरात झोपडी वरून भितीच्या छायेखाली अभ्यास सुरू; ग्रामस्थ व विद्यार्थी नाराज…
कुडाळ. ता. ०४: तालुक्यातील आंदुर्ले गावात नेटवर्क नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना गावातील डोंगरात झोपडी बांधून त्या ठिकाणी अभ्यास करावा लागत आहे.
याबाबत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारंवार टॉवरसाठी पाठपुरावा केला. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांत कमालीची नाराजी आहे. गावात डोंगरावर बांधण्यात आलेली झोपडी जरी रेंज देणारी असली तरी त्या ठिकाणी जंगलमय भाग असल्यामुळे भीतीचे संकट आहे असे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
याबाबत आंदुर्ले विकास सोसायटीचे चेअरमन महेश राऊळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी संतोष खानोलकर, सूरज राऊळ, चेतन राऊळ, योगेश राऊळ,अंकित गावडे,राकेश राऊळ,दीपक चव्हाण उपस्थित होते.
तसेच महेश राऊळ,सतिश राऊळ,प्रफुल राऊळ,रुपेश राऊळ,निनाद राऊळ,कुणाल मुरकर,ओमकार राऊळ,अश्विनी राऊळ,साक्षी राऊळ,या सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन ही झोपडी उभी केली, व महेश दत्तात्रय राऊळ यांनी आपल्या डोंगरावरील जमिनीत झोपडीसाठी जागा दिली.
आता तरी प्रशासन लोकप्रतनिधी, राजकीय पुढारी यांचे डोळे उघडतील आणि लवकरात लवकर एक सुसज्ज मोबाईल नेटवर्क सुविधा आंदूर्लेवासीयांना मिळेल अशी आशा विद्यार्थी व ग्रामस्थांना आहे.