व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी व सहकाऱ्यांनी घेतली राष्ट्रवादी नेत्यांची भेट…
सावंतवाडी,ता.०४: राष्ट्रवादीच्या व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नुकतीच मुंबई येथे जावून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.यावेळी जिल्ह्यातील संघटना मजबूत करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. या प्रसंगी व्यापार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हिदायतुल्ला खान,महिला शहराध्यक्ष चित्रा बाबर-देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी राज्य तसेच जिल्ह्यातील व्यापार्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात व्यापारी मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आपण राज्यातील व्यापाऱ्यांचे पुन्हा भरण्यासाठी आवश्यक ती धोरण जाहीर करून त्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल,असे श्री.अजित पवार यांनी यावेळी सांगितले.