Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभ्रष्टाचारी सिव्हिल सर्जनला बदलून निष्क्रिय माणूस सत्ताधार्‍यांनी आणला...

भ्रष्टाचारी सिव्हिल सर्जनला बदलून निष्क्रिय माणूस सत्ताधार्‍यांनी आणला…

परशुराम उपरकर; रुग्णवाहिका न मिळाल्यानेच मालवण येथील महिलेचा मृत्यू…

कणकवली,ता.०४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडून आलेले आमदार, खासदार,पालकमंत्री जनतेचे आरोग्य राखण्यात अपयशी ठरले आहेत. मालवण येथील महिलेचा रुग्णवाहिका ५.३० तास न मिळाल्याने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी सिव्हिल सर्जन चाकूरकर यांची बदली करत त्यांच्या जाग्यावर दोन वेळा निलंबित झालेले श्रीमंत चव्हाण या निष्क्रिय अधिकाऱ्याला आणले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शिवसेनेला सत्ता असताना तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री, खासदार,आमदार केवळ घोषणा करत आहेत. मेडिकल कॉलेज,महिला हॉस्पिटल व येथील जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या सेवांचे लोकार्पण करत जनतेची दिशाभूल करत आहेत. लोकप्रतिनिधींना नागरिकांचे जीव वाचवायचे की गमवायचे आहेत?, नागरिकांना आरोग्याच्या विवंचनेत ठेवून केवळ पत्रकबाजी व फोटोसेशन करण्यामध्ये सत्ताधारी रमले आहेत.सर्वच जिल्ह्यातील आरोग्य रुग्णालयांमध्ये दयनीय अवस्था आहे. रुग्णांना सेवा मिळत नाही,अनेक रिक्त पदे आहेत, त्यावर सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत,असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने आलेले सिव्हील सर्जन श्रीमंत चव्हाण हे दोन वेळा निलंबित झालेले आहेत.कुडाळ रुग्णालयात त्याची सेवा नागरिकांना माहीत आहे. देवगडमध्ये बदली झाल्यानंतर वर्षभर कामावर हजर झाले नव्हते.अनेक ठिकाणी त्यांची सेवा फारशी चांगली राहिलेली नाही.त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे का?,हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments