पीडीत युवतीवर खासगी दवाखान्यात उपचार; आरोपीवर कारवाईची मागणी..
कणकवली,ता.०४: देवगड तालुक्यातील विजयदुर्ग परिसरातील “त्या” पीडित अल्पवयीन कुमारी मातेच्या नवजात अर्भकाचा प्रसृती दरम्यान कणकवलीत एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.पीडित युवतीची ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी प्रसृती झाली. त्याचवेळी नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची खबर कणकवली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
अल्पवयीन युवतीवर चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला होता. कणकवलीत खाजगी रुग्णालयात त्या पीडित युवतीच्या काही दिवस पोटात दुखू लागल्याने प्रसृतीसाठी दाखल केले. मात्र प्रसृतीदरम्यानच अर्भकाचा मृत्यू झाला. कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी ४ वाजता आकस्मिक मृत्यू करण्यात आली आहे. आरोपीला तातडीने पोलिसांनी अटक करावी,अशी मागणी केली जात आहे.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.