Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हयात "सिंधुदुर्ग कला अकादमी"ची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रयत्न...

जिल्हयात “सिंधुदुर्ग कला अकादमी”ची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रयत्न…

लोकराजा सुधीर कलिंगनांचा पुढाकार; दशावतारा सोबत भजन, फुगडी, कळसूत्री बाहुल्यां कलाकारांचा असणार समावेश…

सावंतवाडी\स्वप्नील नाईक,ता.०५: बदलत्या काळात लोप पावत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, दशावतार, कीर्तन, चपई नृत्य, फुगडी, कळसुत्री बाहुल्या अशा कला पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमी सुरू करण्याचा मानस जिल्ह्यातील काही कलाप्रेमींना व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी रविवार ११ तारखेला कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात बैठक ठीक १० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, निवृत्त सनदी अधिकारी अशोक पाडावे, कुडाळ येथील कलाप्रेमी बापू नाईक यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. या वेळी उपस्थित राहून पुढील भूमिका ठरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे आवाहन ज्येष्ठ दशावतार कलाकार लोकराजा सुधीर कलिंगण यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर ही कला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. या अकादमीच्या माध्यमातून दुर्लक्षित राहिलेल्या कलाप्रकारात सह कलाकाराला समाजात स्थान मिळावे, त्याचा योग्य पद्धतीने सन्मान व्हावा, भविष्यात त्यांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये, कलाकारांच्या कले सोबत कलेला ही माध्यम मिळावे. या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत याबाबत पुढील भूमिका ठरवून निर्णय घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments