बांदा,ता. ०५ :
शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार आज जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती प्रमोद कामत यांनी स्वीकारला. डी बी वारंग यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपल्याने आजच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम होऊन नवीन पदाधिकारी निवड होइपर्यंत कामत यांच्याकडे प्रभारी कार्यभार राहणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डी बी वारंग, सहसचिव धोंडू पणशीकर यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपल्याचे संस्थेचे माजी सचिव प्रेमानंद नाडकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे नियमानुसार संस्थेचे उपाध्यक्ष असलेले प्रमोद कामत यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार आज बैठक घेऊन देण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य मंदार कल्याणकर, सतीश येडवे, स्वीकृत सदस्य शीतल राऊळ, नीलिमा पित्रे, माजी सचिव प्रेमानंद नाडकर्णी, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम घेऊन रिक्त जागांवर उमेदवार निवड झाल्यानंतर कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रमोद कामत म्हणाले की, शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. सर्वाना सोबत घेत मार्गदर्शन घेऊन नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर संस्थेचा भर देणार असल्याचे सांगितले. संस्थापक डॉ. बी. बी. गायतोंडे यांना अभिप्रेत कार्य करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू.
शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या प्रभारी अध्यक्षपदी प्रमोद कामत यांची निवड….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES