मालवण, ता.०५: आचरा गावचे सुपुत्र सुब्रमण्यम केळकर यांची भारतीय पोलिस सेवेत आयपीएस म्हणून निवड करण्यात आली आहे.
श्री. केळकर हे यूपीएससी परीक्षेत देशात ४९७ आले होते. त्यांची निवड झाल्याचा आदेश आज प्राप्त झाला आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी हैदराबाद येथे हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यांनी युपीएससीसाठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान निवडला होता. तयारीसाठी एका हॉस्टेलमध्ये राहुन त्यांनी तयारी केली होती. यासाठी ते पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत होते. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्यांनी केला होता. सरावासाठी ते १० ते १२ तास अभ्यास करत त्यांनी यश संपादन केले होते.
आचऱ्याचे सुपुत्र सुब्रमण्यम केळकर यांची आयपीएस म्हणून निवड…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES