Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातहसीलदार अजय पाटणे यांची पेणला बदली...

तहसीलदार अजय पाटणे यांची पेणला बदली…

मालवणवासीयांकडून बदलीनिमित्त सत्कार…

मालवण, ता. ०५ : प्रामाणिक आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील तहसीलदार अजय पाटणे यांची पेेेण येथे बदली झाली आहे. बदलीनिमित्त तालुका शिवसेना, स्वराज्य सामाजिक-सांस्कृतिक संस्था, स्वराज्य महिला ढोल पथक यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी तहसीलदार श्री. पाटणे यांची भेट घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लवकरच प्रांताधिकारी पदी बढती होऊन पुन्हा मालवण-कुडाळला या अशा सदिच्छा दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, रवी तळाशीलकर, अनंत पाटकर, यासह पालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आवेक्षक सुधाकर पाटकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार यांच्या १९ महिन्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक संजय गांधी निराधार योजना लाभ लाभार्थी जनतेला देण्यात आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच कार्यकाळात शांततेत पार पडल्या. कोरोना काळात तर रस्त्यावर उतरून जनजागृती, गरजूना धान्य वाटप यासह अविरत सेवाकार्य तहसीलदार पाटणे यांनी केले. मालवण शहर सुरवातीचे चार महिने कोरोनामुक्त ठेवण्यात तहसीलदार अजय पाटणे यांची भूमिका मोलाची राहिली. आजही मालवण शहर व तालुक्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. अशा अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी तहसीलदारांच्या कार्याचा गौरव केला.
स्वराज्य सामाजिक सांस्कृतिक संस्था व स्वराज्य महिला ढोल-ताशा पथक यांच्या वतीने अध्यक्षा शिल्पा खोत, खजिनदार प्रतिभा चव्हाण
यांनी तहसीलदारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी साक्षी मयेकर, रूपा कुडाळकर, कृपा कोरगावकर, दिया पवार यासह अन्य महिला उपस्थित होत्या. मालवणातील आपली सेवा राज्यात आदर्शवत अशी आहे. कोरोना काळातही जीव धोक्यात घालून आपण जनसेवा केली. अशा शब्दात शिल्पा खोत यांनी तहसीलदार श्री.पाटणे यांच्या कार्याचा गौरव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments