ओरोस,ता.५:
देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी प्रवीण आत्माराम अनभवणे ३३ याला येथील विशेष न्यायालयाचे न्यायधीश प्रकाश कदम यानी ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.
देवगड तालुक्यातील एका गावामधील एका अल्पवयीन मुलीवर प्रवीण अनभवणे याने फेब्रुवारी महिन्यापासून लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यात पीडित मुलीवर त्याने वारंवार अत्याचार केले. यातूनची ती आठ महिन्याची गरोदर राहिली. अशी फिर्याद पीडित मुलीने पोलिस स्थानकात दाखल केली. पीडित युवती वडिलांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन जात असल्याची संधी साधत संशयित तिला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पीडित युवतीला त्रास होवू लागल्याने उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. तेथे प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकाचा मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सात दिवसाची पोलीस कोठडी….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES