ओरोस,ता.०५: एस.राजेंद्रन हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रावजी यादव याची निवड झाली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यानी आपल्या सामाजिक कार्याची दखल घेतली असून त्यांच्या आदेशानेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुबोध वाघमोठे यानी जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आपल्याला दिल्याचे यादव यानी सांगितले.
शेाषितांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्रीस्तरापर्यंत आपले प्रयत्न राहणार आहेत. जिल्हा कार्यकारिणी लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याचे यादव यानी स्पष्ट केले.