वेंगुर्ला,ता.०६:वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसानंतर काल १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून तालुक्यातील बळींची संख्या ९ झाली आहे. तसेच आत्ता पर्यंत २८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यात काल १ रुग्ण पॉझिटिव्ह सापडला तो वेंगुर्ला-कुर्लेवाडी येथील सहवासीत आहे. दरम्यान काल ९ व्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. आसोली रांजणवाडी येथील ७० वर्षीय रुग्णाला १ तारखेला ओरोस येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा स्वब रिपोर्ट ३ऑक्टोबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र उपचारा दरम्यान याच दिवशी रात्री त्यांचे ओरोस येथे निधन झाले.
तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५७ झाली असून त्यापैकी २८८ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून आता ६० रुग्ण उपचाराखाली आहेत.
वेंगुर्ले तालुक्यात कोरोनाचा नववा बळी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES