सिंधुदुर्गनगरी,ता.०६: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप भात सर्वसाधारण गट २०१९ या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र तथा प्रगतशील शेतकरी लश्मण अनंत वराडकर यांनी सर्वाधिक प्रतिहेक्टर १२६.७ क्विंटल भातपिक उत्पादन घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्यांच्या या यशापध्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन सतिश सावंत व बँकेच्या संचालक मंडळाने प्रधान कार्यालय सभागृहात वराडकर दांपत्यांचा सत्कार केला.
यावेळी बँकेचे संचालक विकास सावंत,विद्याप्रसाद बांदेकर,गुरूनाथ पेडणेकर,अतुल काळसेकर,आत्माराम ओटवणेकर,दिगंबर पाटील,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई,उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.