Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याइन्सुली घाटात भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक खोळंबली

इन्सुली घाटात भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक खोळंबली

बांदा, ता. ०६: बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटातील सातजांभळी देवस्थान नजीक भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
भर दुपारी जांभळीच्या झाडाची भली मोठी फांदी तुटून रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर वाहने नसल्याने जीवितहानी टळली. स्थानिकांनी व वाहन चालकांनीच झाडाची फांदी बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments