दोडामार्ग राष्ट्रवादीची तहसीलदारांकडे मागणी;मंडळ अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर नाराजीदो
दोडामार्ग,ता.०६: तालुक्यातील वझरे येथील बंद खाणीत पडून मृत्यू झालेल्या “त्या” चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी विचारल्यानंतर “त्या” खाणी अस्तित्वात नसल्याचा खुलासा मंडळ अधिका-याने केला, त्यामुळे या प्रकाराची चौकशी होऊन संबंधित खाण मालक व महसूलचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी या पथकाकडून करण्यात आलेली आहे.
यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर,अल्पसंख्य जिल्हा अध्यक्ष नाझिर शेख, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर,संदेश वरक यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.