Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वॉटर एटीएमचा शुभारंभ वेंगुर्लेत...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वॉटर एटीएमचा शुभारंभ वेंगुर्लेत…

एक रुपयात मिळणार एक लिटर पाणी; नगरपरिषदेचा उपक्रम…

वेंगुर्ला,ता.०६:
वेंगुर्ले शहरात १ रुपयात आता १ लिटर पाणी मिळणार आहे. नगरपरिषदेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पाहिल्या “वॉटर एटीएम” चा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला.
वेंगुर्ला शहरात येणाऱ्या पर्यटक, शहरातील नागारिकांना तसेच ग्रामिण भागातून येणाऱ्या नागारिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने नाविण्यपुर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करुन शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ले न. प. हि सिंधुदुर्गातील पहिलीच न. प. आहे.
शहरात ग्रामिण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प कींमतीत उपलब्ध व्हावे यासाठी नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ले बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व न. प. इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन सुविधा उभारण्या संदर्भात ठराव करुन सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यासाठी नाविण्यपुर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता. सदर ३० लाख रुपये निधीतून शहरात पाच ठिकाणी हि वॉटर एटीएम मशिन बसविण्यात आली आहेत.
आज बाजारात वीस रुपये लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र न. प. ने साधं पाणी एक रुपया लिटर व थंड पाणी एक रुपया अर्धा लिटर असे माफक दर ठेवले आहेत. या मशिनचे उद्घाटन मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधिक्षक संगिता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
या वॉटर एटीएम मशिनसाठी दिपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगराध्यक्ष गिरप यांनी केसरकर यांचे आभार व्यक्त केले. न. प. मध्ये सर्वच पक्षाचे नगरसेवक एक असून विकास कामासाठी संघटीतपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments