सत्यशोधक महिला आघाडीची मागणी; तहसीलदारांना निवेदन..
कणकवली, ता.६: उत्तरप्रदेश हाथरस येथील घटनेतल्या सर्व आरोपीना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी. तसेच या घटनेतील पीडित मुलीला न्याय द्या अशी मागणी सत्यशोधक महिला आघाडी महाराष्ट्र या संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन आज कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना देण्यात आले.
कणकवलीत सत्यशोधक संघटनेच्या पदाधिकारी अॅड. स्वाती तेली, अमोल कांबळे, अॅड. सुदीप कांबळे, विवेक ताम्हणकर, दीपा ताटे, वर्षाराणी जाधव, दया आजवेलकर, अंकिता कदम, लता कोरगावकर, दीपक जाधव, प्राध्यापक सचिन वासकर आदींनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये हाथरस येथील मुलीवर अमानवीय अत्याचार करणार्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. या सर्व प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी केली जावी. हाथरस येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.