रावजी यादव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…
ओरोस ता ६
पशु पक्षांप्रमाणे मानव निर्मित जातनिहाय जनगणना व्हावी. जनगणना अर्जामध्ये बौद्ध समाज गणनेसाठी स्वतंत्र कॉलम करावा.आंतरजातीय विवाह समारंभ पूर्ववत सुरु करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत यादव यानी जिल्हाध्यक्ष या नात्याने विविध मागण्या केल्या आहेत. लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठित कर्जमाफी करावी. महिला बचतगटांना कर्जमाफी द्यावी. सर्वच विद्यार्थ्यांना शालेय शुल्क माफ करावे. कोरोना महामारिचे यथायोग्य नियोजन करून शाळा, कॉलेज सुरु करावेत. शासकीय, अशासकीय सर्व समित्या कार्यरत कराव्यात. शासकीय सेवतील कंत्राटी ऐवजी सेवाभरती नियमानुसार मानधन पद्धत लागू करावी. डॉ आंबेडकर यांचे वरळी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील १९९९ पासून प्रलंबित असलेले चेंज रिपोर्ट विहित कालावधीत पूर्ण करावेत. दादर येथील डॉ आंबेडकर यांचे स्मारक तात्काळ सुरु करावे. शोषित पीडित समाजाचे महामंडळावरिल कर्ज माफ करावे. अंशकालीन स्त्री परिचर, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना पेंशन लागू करावी. त्यांना भाऊबीज मिळावी, अशा एकूण १५ मागण्या यादव यानी केल्या आहेत.