ओरोस,ता.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ घावनळे खोचरेवाडी येथे राहणारे आणि सध्या मुंबई विक्रोळी येथे वास्तव्यास असणारे गुरुनाथ गणेश नार्वेकर या सिंधुदुर्ग पुत्राचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय येथे प्राणिपाल पदावर कार्यरत असणाऱ्या गुरुनाथ नार्वेकर यांना राष्ट्रीय स्तरावरील “प्राणीमित्र पुरस्कार २०२०” देऊन गौरविण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील सर्व प्राणी संग्रहालयामध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांच्यावतीने प्राणिसंग्रहालयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सन्मानपूर्वक दखल घेतली जावी या उद्देशाने यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहा पासून “प्राणी मित्र” पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. याअंतर्गत प्राणी संग्रहालयातील विविध पदांवर कार्यरत चार कर्मचाऱ्यांना प्राणी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये प्राणी पाल पदावर गेली 30 वर्षे कार्यरत असणाऱ्या सिंधुदुर्ग पुत्र गुरुनाथ नार्वेकर यांचा समावेश आहे.
गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय प्राणीमित्र २०२० पुरस्काराने सन्मान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES