आंबोलीतील प्रकरण; नेमकी हत्या कशी झाली, हे कारण मात्र अद्यापही “गुलदस्त्यात”…
सावंतवाडी,ता.०६: आंबोली घाटात आढळून आलेल्या “त्या” महिलेचा शारिरीक संबंध ठेवताना गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. तशी आरोपींनी कबुली दिली आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान संबंधित महिला ही स्वखुशीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी “त्या”चौघांसमवेत कोलगाव येथे गेली होती, असे असले तरी नेमका तिचा खून कसा झाला,कोणत्या कारणामुळे झाला हे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचा तपास पोलीस घेत असून पुरावे मिळाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल,असे श्री.खोत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,संबंधित महिला मळगाव येथून बेपत्ता होती तशी नोंद एक सप्टेंबरला येथील पोलीस ठाण्यात दाखल होती.याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या अखत्यारीत सुरू होता,हा तपास सुरू असतानाच आंबोली घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला .या दोन्ही गोष्टींचा विचार करून मळगाव येथील महिलेच्या बेपत्ता प्रकरणावरून अखेर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला.संबंधित महिलेच्या घरात सापडलेल्या नवीन मोबाईलच्या बॉक्स वरून मोबाईलच्या एमआय नंबर वरून या महिलेच्या क्रमांकावर कोणते कॉल शेवटच्या दिवशी आले होते,यावरून संशयित पर्यंत पोहोचण्यास मदत झाली.तसेच हा तपास करताना पोलिसांच्या दोन्ही टीमने मोठी मेहनत घेतली.यातूनच एक लिस्ट प्रकरणाचा गुंता उलगडण्यास मार्ग सापडला. संबंधित महिलाही त्या युवकाकडे स्वइच्छेने गेली होती. त्यामुळे याला बलात्कार असे म्हणता येणार नाही,असे श्री खोत त्यांनी सांगितले.मात्र त्यातील मुख्य संशयित व त्याचा साथीदार त्यांना खाकी हिस्का दाखविल्यावर सत्य बाहेर पडले. तर अन्य दोन अल्पवयीन युवकांना कौशल्याने विचारणा करून संबंधित प्रकाराची माहिती मिळविण्यात यश मिळविले. हे प्रकरण भक्कम होण्यासाठी महिलेची घाटात टाकलेली पर्स, मोबाईल,व चप्पल या पुराव्यांचा शोध अद्याप सुरू असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला आडणेकर त्या कारमध्ये या महिलेवर संबंध ठेवले असल्याचेही संशयिताने कबुली दिली आहे. तसेच संबंधित महिलेच्या गळ्यावर हाताचा दाब पडल्यामुळे मृत्यू झाला,असल्याचेही संशयिताने सांगितले आहे. ही सर्व घटना ज्या कारमध्ये घडली. ती कारही जप्त करण्यात आली आहे. असे श्री खोत यांनी सांगितले.