दोडामार्ग येथिल फसवणूक प्रकरण;अन्य दोघा संशयितांच्या शोधात पोलिस…
सावंतवाडी,ता.०६: डमी माणसाचा आधार घेत बोगस खरेदीखत तयार करुन कोल्हापुर येथील एकाची साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोडामार्ग येथील दोघांना आज येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.याकामी अॅड स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहीले.
दरम्यान या प्रकरणात अन्य दोघे फरार आहेत. त्यांचा तपास दोडामार्ग पोलिस घेत आहेत. या चौघांनी कोल्हापूर हातकणंगले येथिल अनिल हेर्ले या व्यक्तीच्या नावाने बोगस आधारकार्ड तयार केले होते. तसेच त्या नावाची दुसरी व्यक्ती तयार करून दोडामार्ग येथे खरेदी विक्रीचा व्यवहार पुर्ण केला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्ले यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार गौरेश टोपले (रा.भेडशी), परेश परब (रा.मडुरा), या दोघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. तत्पुवी ते पाच दिवस पोलिस कोठडीत होते.तर संजय गावडे (रा. खानयाळे) आणि मोहन गवस (रा.बोडदे) या दोघांना अद्याप पर्यत अटक झालेली नाही. दरम्यान या प्रकरणात संबधितांना अटक करण्याबरोबर नेमके बोगस आधारकार्ड कोठे तयार केले,तसेच डमी म्हणून वापरण्यात आलेली व्यक्ती नेमकी कोण?,याचा शोध दोडामार्ग पोलिस घेत आहेत.