अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे आयोजन…
वेंगुर्ला,ता.०६: कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी आपले शिक्षक बंधू भगीनी विविध माध्यमांद्वारे अतिशय मेहनत घेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या उद्देशाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला या शिक्षक संघटनेच्या वतीने तालुकास्तरील विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी १ली ते २री, ३री ते ५वी, व ६वी ते ७वी अशा तीन गटात पाठ्यपुस्तकातील साभिनय मराठी कविता गायन स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील साभिनय इंग्रजी कविता गायन स्पर्धा, मराठी पाठ्यपुस्तकातील कथा कथन स्पर्धा, इंग्रजी पुस्तकातील कथा कथन(story telling) स्पर्धा,बालचित्रकला स्पर्धा (विषय – कोरोना जनजागृती चित्र) इत्यादी तसेच शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा ( विषय – आॅनलाईन शिक्षण), कॅलिग्राफी स्पर्धा( ‘सत्यमेव जयते’ फलकलेखन),फोटोग्राफी स्पर्धा( तालुक्यातील निसर्ग)
स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेच्या च्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थी व शिक्षकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धेचे स्वरूप व अधिक माहितीसाठी 8275390680 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.एकनाथ जानकर, सचिव सागर कानजी व पदाधिकारी यांनी केले आहे.