Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याघरात असलेला मोबाईल बॉक्स ठरला महत्वाचा दुवा...

घरात असलेला मोबाईल बॉक्स ठरला महत्वाचा दुवा…

आंंबोली खून प्रकरण; तांत्रिक पुरावे आढळल्यामुळे संशयितांचा बनाव उघड…

सावंतवाडी/निखिल माळकर,ता.०६: आंबोली घाटात खून करण्यात आलेल्या त्या महिलेच्या घरात मिळून आलेला नवीन मोबाईल बॉक्स खूनाचा छडा लावण्याचा मुख्य दुवा ठरला. त्यामुळेच आम्ही संशयितांपर्यत पोहोचू शकलो. असा दावा सावंतवाडी पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांनी केला आहे.दरम्यान या सर्व गोष्टीत प्रथमतः आम्ही ते नव्हेच अशी भूमिका घेणार्‍या संशयितांना आम्ही सीडीआर,मोबाईल लोकेशन आणि सीसीटिव्ही फुटेज आदी गोष्टींचे तांत्रिक पुरावे आढळल्यामुळे त्यांचा बनाव अखेर उघड झाला.आता या प्रकरणात आणखी कोण नाही. मात्र नेमका त्या महिलेचा मृत्यू कसा झाला?, याचा आम्ही शोध घेत आहोत,असा दावा श्री खोत यांनी केला आहे.
आज तपासाचा काही भाग पुर्ण झाल्यानंतर श्री.खोत यांनी माहीती दिली ते म्हणाले,ते पुढे म्हणाले की, संबंधित महिला मळगाव येथून बेपत्ता होती.तशी नोंद १ सप्टेंबरला येथील पोलीस ठाण्यात दाखल होती. याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या अखत्यारीत सुरू होता, हा तपास सुरू असतानाच आंबोली घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. या दोन्ही गोष्टींचा विचार करून मळगाव येथील महिलेच्या बेपत्ता प्रकरणावरून अखेर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. संबंधित महिलेच्या घरात सापडलेल्या नवीन मोबाईलच्या बॉक्स वरून मोबाईलच्या एमआय नंबर वरून या महिलेच्या क्रमांकावर कोणते कॉल शेवटच्या दिवशी आले होते,यावरून संशयित पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तसेच हा तपास करताना पोलिसांच्या दोन्ही टीमने मोठी मेहनत घेतली. यातूनच एक लिस्ट प्रकरणाचा गुंता उलगडण्यास मार्ग सापडला.संबंधित महिलाही त्या युवकाकडे स्वइच्छेने गेली होती. त्यामुळे याला बलात्कार असे म्हणता येणार नाही,असे श्री खोत त्यांनी सांगितले.मात्र त्यातील मुख्य संशयित व त्याचा साथीदार त्यांना खाकी हिस्का दाखविल्यावर सत्य बाहेर पडले. तर अन्य दोन अल्पवयीन युवकांना कौशल्याने विचारणा करून संबंधित प्रकाराची माहिती मिळविण्यात यश मिळविले. हे प्रकरण भक्कम होण्यासाठी महिलेची घाटात टाकलेली पर्स, मोबाईल,व चप्पल या पुराव्यांचा शोध अद्याप सुरू असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला आडणेकर त्या कारमध्ये या महिलेवर संबंध ठेवले असल्याचेही संशयिताने कबुली दिली आहे. तसेच संबंधित महिलेच्या गळ्यावर हाताचा दाब पडल्यामुळे मृत्यू झाला,असल्याचेही संशयिताने सांगितले आहे. ही सर्व घटना ज्या कारमध्ये घडली. ती कारही जप्त करण्यात आली आहे. असे श्री खोत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments