संजू परबांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट; शहरातील रस्त्यांसाठी निधीची केली मागणी…
सावंतवाडी ता.०७: शहरात “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन द्या,अशी मागणी सावंतवाडी पालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.तसेच शहरातील रस्त्यांसाठी तात्काळ निधी मंजूर करा,अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.दरम्यान येत्या डिसेंबर पर्यंत पहिला निधी आपल्याला देण्यात येईल,असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.याबाबत श्री.परब यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत श्री.परब म्हणाले, शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम पालिकेने यशस्वी केला आहे.त्यामुळे यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची व्यवस्था करा,तसेच सावंतवाडी शहरातील रस्त्यांसाठी तात्काळ निधी मंजूर करा,असे सांगण्यात आले.दरम्यान येत्या डिसेंबरपर्यंत पहिला निधी तुम्हाला देण्यात येईल,असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित उपस्थित होते .