Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबंदूकीच्या गोळीने जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष...

बंदूकीच्या गोळीने जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष…

कणकवली, ता.७: बंदुकीच्या गोळीचे छरे लागून दोघांना जखमी केल्याच्या आरोपातून कणकवली न्यायालयाने आज एकाची मुक्तता केली. हा प्रकार २३ फेब्रुवारी २०१६ रोजी घडला होता. आरोपी राजेंद्र डिचोलकर यांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीचे छरे लागल्याने संदीप खानविलकर (रा.हरकुळ खुर्द) आणि सुभाष रांबाडे (रा.बावशी) हे दोघे जखमी झाले होते. या खटल्याचा निकाल आज लागला. यात येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.जमादार यांनी आरोपी राजेंद्र काशिनाथ डिचोलकर याची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावतीने अ‍ॅड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.
बावशी शेळीचीवाडी येथील जंगलात २३ फेब्रुवारी २०१६ रोजी तिघेजण शिकारीसाठी गेले होते. यावेळी राजेंद्र डिचोलकर यांनी काळोखात जंगली जनावराच्या दिशेने बार काढला. यावेळी शिकारीसाठी झुडपात लपलेल्या संदीप खानविलकर व सुभाष रांबाडे यांनी झुडपात हालचाल केल्याने शिकार समजून घातलेल्या गोळीतील काही छरे दोघांनाही लागून ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिस पाटील विजय मुकुंद मोर्ये रा. तोंडवली बोभाटेवाडी यांनी राजेंद्र डिचोलकर याच्याविरूद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार डिचोलकर यांच्यावर भादंवि कलम ३३७, ३३८, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५, बारी पदार्थ अधिनियम १८८४ चे कलम
९ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून विनापरवाना बंदूक व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच आरोपी हा नियमित शिकारी असल्याचे साक्षीदारांच्या साक्षीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पाच साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. आरोपीने गैरकायदा विनापरवाना काडतूस बंदूक बाळगल्याचे तसेच बारी पदार्थ बाळगल्याचे सिद्ध न झाल्याने, तसेच बंदुकीतून बार उडून दुखापत झाल्याचे सिद्ध न झाल्याने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments