Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासख्या मामाने घातला भाच्यांना गंडा...

सख्या मामाने घातला भाच्यांना गंडा…

भोम येथील घटना; मुकबधीर महिलेची पोलिसात तक्रार…

वैभववाडी/पंकज मोरे,ता.०७:

मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत सख्या मामानेच संयुक्त बँक खात्यावरील तब्बल २३ लाख रूपयांची रक्कम हडप केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौ. रिया रामचंद्र जाधव रा. भोम या मुकबधीर महिलेने वैभववाडी पोलिसात धाव घेतली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. व हडप केलेली रक्कम परत मिळावी असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, माझी आई कल्पना विजय तळेकर ही भोम येथील आहे. परंतु ती सद्यस्थितीत मयत आहे. तिला मी व माझा भाऊ राजेश विजय तळेकर असे सरळ दोन वारस आहोत. माझ्या आईच्या नावे असलेली भोम येथील जमीन अरुणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेली आहे. त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून आम्हाला २५ लाख रुपये मंजूर झाले. दरम्यान माझा मामा एकनाथ सदाशिव चव्हाण हा आम्हा दोन्ही भावंडांना घेऊन भुईबावडा येथील विदर्भ – कोकण ग्रामीण बँकेत गेला.
तिघांच्या नावाचे संयुक्त खाते त्याने उघडले. व मोबदल्याची रक्कम या खात्यावर जमा केली. खात्यावर पैसे जमा झाल्यापासून मी आतापर्यंत एकही देवघेवीचा व्यवहार केलेला नाही. असे असताना आमच्या खात्यावरील २३ लाख ६ हजार पेक्षा जास्त रक्कम परस्पर संगनमताने काढण्यात आली आहे. मी मूकबधिर व भाऊ मतिमंद याचाच गैरफायदा घेण्यात आला आहे. तरी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. व हडप केलेली रक्कम परत मिळावी असे तिने तक्रारीत म्हटले आहे. या अपहार प्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments