भाजपा युवा मोर्चाचे तहसीलदार यांना निवेदन
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात आधारकार्ड सुविधा केंद्र सुरु करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे. वैभववाडीत आधारकार्ड संबंधित कोणतीही सुविधा नाही. शासनाने आधारकार्ड सक्तीचे केले आहे. बऱ्याच जणांनी सुरुवातीच्या काळात घाईगडबडीत आधारकार्ड काढली आहेत. परंतु त्यावर असंख्य चुका आहेत. त्यात बदल करावयाचा झाल्यास अथवा नवीन कार्ड काढायचे झाल्यास कणकवली तालुक्यात जावे लागते. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. तरी आठ दिवसात आधारकार्ड सुविधा केंद्र सुरू करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, नवलराज काळे, अनंत फोंडके, अमोल शिवगण, उत्तम मोपेरकर, सत्यवान दळवी, सुहास सावंत व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.