देवगड ता.०७:
रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याला धडक बसून गंभीर दुखापत झाल्यामुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या वृध्दाचे उपचारादरम्यान निधन झाले.तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे.प्रल्हाद साटम वय-७३,असे त्यांचे नाव आहे.तर दुचाकी चालक त्यांचा मुलगा दिपक हा जखमी झाला आहे.ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जामसंडे-आझादनगर येथे घडली.याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दीपक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती देवगड पोलिसांकडून देण्यात आली.
प्रल्हाद हे आपल्या मुलांसमवेत दुसऱ्या मुलांना भेटण्यासाठी गेले होते.तेथून घरी परतत असताना हा अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.