उत्तम पाटील यांची माहीती; रुग्णांच्या मोबाईलवर मिळणार एक्स-रे ची “सॉफ्ट कॉपी”…
सावंतवाडी,ता.०८: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात डीजीटल “एक्स-रे” मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबधित रुग्णाच्या मोबाईलवर थेट एक्स-रेची “सॉफ्ट कॉपी” देण्याची सोय या मशीनमध्ये उपलब्ध आहे.याबाबतची माहीती रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील यांनी दिली.
दरम्यान अनेक वर्षानी ही आधुनिक मशीन उपलब्ध झाल्यामुळे याचा फायदा रुग्णांना होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेले तीनहून अधिक वर्षे येथील रुग्णालयात असलेले एक्स-रे मशीन वारंवार बंद पडत होते. त्यामुळे जुन्याच मशिनवर एक्स-रे काढण्याचे काम सुरू होते.मात्र यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ट स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्या नंतरही आधुनिक मशीन देण्यात आली आहे,असे श्री.पाटील यांनी सांगितले.