आरोंदा येथील ग्रामस्थांचा इशारा; खतविक्रीत आणि रेशनधान्य दुकानावर अपहार झाल्याचा आरोप…
सावंतवाडी,ता.०८: आरोंदा येथील सोसायटीत खत विक्रीत आर्थीक अपहार करण्यात आला आहे. तसेच कर्जमाफीच्या काळात रेशनधान्य दुकानावर दिल्या जाणार्या धान्यात घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करून सुध्दा कोणीच दखल घेत नसल्यामुळे ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिलीप नाईक व देवदत्त पडते यांच्यावतीने सुर्यकांत नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.यात संबधित अधिकारी तसेच या अपहारात समाविष्ट असलेल्यांची चौकशी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.