चिपळूण,ता.०८:
चिपळुण संगमेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांची पंचायत राज समीती विधीमंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शेखर निकम हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून त्यांची येथे ओळख आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
चिपळुण संगमेश्वर मतदार संघामधुन आमदार म्हणून निवडून आल्यावर मतदार संघातील अनेक विषय त्यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडले आहेत. त्याच्याकडे संयमी नेत्रुत्व म्हणून पाहिले जाते.
विधीमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी केलेले अभ्यासू भाषण आणि अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी हे पाहुन त्यांची विधीमंडळाच्या या महत्त्वाच्या पंचायतराज समीती सदस्यपदि निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्याचे सहकारी विधीमंडळ सदस्य तसेच सर्व मतदार संघातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पंचायत राज समिती विधिमंडळाच्या सदस्यपदी आमदार शेखर निकम…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES