आंबोली खून प्रकरण; मृतदेह घाटात टाकून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आणखीन एक ताब्यात…
सावंतवाडी/निखिल माळकर ता.०८: मळगाव येथिल महीलेचा खून करून
आंबोली घाटात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आज पाचच्या सशयिताला ताब्यात घेतले.नारायण गिरी (रा.कोलगाव) वय -२५,असे त्याचे नाव आहे.संशयितांच्या गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे “तो” त्या ठीकाणी गेला होता.मात्र खुन झाल्याची माहीती मिळाल्यानंतर सुध्दा त्याने मृतदेह घाटात टाकण्यासाठी त्याने चौघांना मदत केल्याचा पोलिसांचा दावा आहे.दरम्यान यातील दोघा संशयितांसह तिघांना आज येथिल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना आणखी तीन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली.याकामी सरकारी पक्षाच्या वतीने स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शारीरीक संंबंध ठेवताना ती महीला मृत झाली.यावेळी तिला आंबोली घाटात टाकण्याचा निर्णय योगेश आडणेकर व त्याच्या सोबत असलेल्या तिघा संशयितांनी घेतला.यावेळी गाडीत पेट्रोल कमी असल्यामुळे आज ताब्यात घेण्यात आलेला नारायण गिरी याला त्यांनी पेट्रोल घेवून बाजारपेठेत बोलावले,आणि तेथून त्या पाच ही जण आबोलीच्या दिशेने निघून गेले.यावेळी त्याला झालेला प्रकार योगेश आडणेकर याने सांगितला.त्यानंतर त्या पाच ही जणांनी त्या महीलेचा मृतदेह आंबोली घाटात ढकलून दिला.व ते माघारी येण्यास फीरले.यावेळी परत येताना गिरी याने त्या मृत महीलेचा मोबाईल फेकूल दिला.अशी कबूली दिली आहे.त्यानुसार तपासात उघड झालेल्या माहीतीनुसार आज गिरी याला कोलगाव येथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.