नागरिकांच्या मागणीला यश; सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची माहिती…
सावंतवाडी ता.०८:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात अचानक बदली करण्यात आलेले डाॅ.अभिजीत चितारी यांना पुन्हा सावंतवाडी रुग्णालयात नेमणूक देण्यात आली आहे.उदया पासून ते हजर होणार आहेत.ते याठिकाणी पुन्हा यावेत यासाठी सर्वपक्षियांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर मावळते जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर यांनी आज तसा आदेश दिला आहे.त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात श्री.चितारी रुग्णांना सेवा देणार आहेत.यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले,असा दावा सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी करत याबाबतची माहिती दिली.